सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही नाही. मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणीतरी ही यादी व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले.

पोलिस बदली

सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही नाही. मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणीतरी ही यादी व्हायरल केल्याचे बोलले जात आहे.

हायलाइट्स:

  • राज्य सरकारकडून बदल्यांची कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नव्हती किंवा तसा कोणताही प्रस्ताव नव्हता
  • कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने ही यादी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे

मुंबई : राज्यातील सरकारी अधिकारी आणि प्रशासनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वचक नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात असतो. अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, राज्य सरकारने अशी कोणतीही यादी प्रसिद्ध केलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची ही यादी नेमकी कोणी बाहेर लीक केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक आहे की नाही, हा प्रश्न पुन्हा एकदा विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
गडचिरोली पोलीस विभागात तब्बल १९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही नाही. मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणीतरी ही यादी व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. राज्य सरकारकडून बदल्यांची कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नव्हती किंवा तसा कोणताही प्रस्ताव नव्हता. कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने ही यादी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याकडून देण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
Mumbai Police Transfer: वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात उलथापालथ; ८६ अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केला होता. हुबेहूब शरद पवार यांच्यासारखा आवाज काढत फोनवरील व्यक्तीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी काही सूचना दिल्या होत्या. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने खातरजमा करण्यासाठी त्यांनी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे चौकशीचे आदेश
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here