हायलाइट्स:

  • चोरट्यांनी धुमाकूळ घातला
  • परिसरातील अनेक घरे फोडली
  • भिंतीत बांधलेली तिजोरीही खणून काढून पळवली

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत या परिसरातील अनेक घरे फोडली. चोरट्यांच्या तावडीतून घारगावचे पोस्ट कार्यालयही सुटले नाही. हे कार्यालय फोडून चोरट्यांनी भिंतीत बांधलेली तिजोरीही खणून काढून पळवून नेली. त्यामध्ये किती रक्कम होती, याची माहिती अद्याप मिळाली नाही. (अहमदनगर क्राईम न्यूज)

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ आणि घारगाव परिसरात बुधवारी पहाटे चोरट्यांनी घरे फोडून चोरी केली. घारगाव येथे टपाल कार्यालय आहे. त्यामध्ये सिमेंट व दगडामध्ये बांधकाम केलेली लोखंडी तिजोरी होती. चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. भिंतीतील लोखंडी तिजोरी खणून कढली आणि चोरून नेली आहे. ही गोष्ट सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी गावातील पोस्टमन किशोर पोळ यांना घटनेची माहिती दिली.

Nitesh Rane: नितेश राणे यांना पुन्हा मोठा दिलासा; कणकवली पोलीस म्हणाले…

पोळ यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली आणि वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक संतोष जोशी, सबपोस्ट मास्तर सुमंत काळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घारगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तक्रार नोंदवून घेण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, तिजोरीत नेमकी किती रक्कम होती, याची माहिती मिळू शकली नाही. पहाटे नांदूर खंदरमाळ या दोन्ही ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरे फोडली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here