अँटी-इन्कम्बन्सीमुळे पक्ष आपल्याला तिकीटच देणार नाही, हे काही नेत्यांना समजले होते. त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मात्र, पराभूत होणारे लोक भाजपमधून चालले आहेत आणि विजयी होणारे उमेदवार भाजपमध्ये येत आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला.

देवेंद्र संजय

शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी, असे संजय राऊत म्हणतात.

हायलाइट्स:

  • संजय राऊत यांनी हाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना करावा
  • आपली उंची किती आणि पंतप्रधान मोदी यांची उंची किती, हे त्यांनी लक्षात घ्यावे

मुंबई :शरद पवार यांच्याविषयी खोचक टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी प्रथम स्वत:ची उंची तपासून पाहावी, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, संजय राऊत (Sanjay Raut) हे कोणाचे प्रवक्ते आहेत, हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी, असे संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांनी हाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना करावा. आपली उंची किती आणि पंतप्रधान मोदी यांची उंची किती, हे त्यांनी लक्षात घ्यावे. तरच संजय राऊत जे सांगू पाहत आहेत, ते बोलण्याचा अधिकार त्यांना आहे, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तसेच गोव्यात भाजपमधून होणाऱ्या आऊट कमिंगवर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचाही देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. अँटी-इन्कम्बन्सीमुळे पक्ष आपल्याला तिकीटच देणार नाही, हे काही नेत्यांना समजले होते. त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मात्र, पराभूत होणारे लोक भाजपमधून चालले आहेत आणि विजयी होणारे उमेदवार भाजपमध्ये येत आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला.
तुमच्यासारख्या टेकड्यांना शरद पवारांसारख्या सह्याद्री पर्वताची उंची काय कळणार; चंद्रकांत पाटलांना राऊतांचं प्रत्युत्तर
शिवसेनेची लढाई ‘नोटा’शीच आहे: फडणवीस

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना गोव्यात आमची लढाई नोटांशी असल्याचे म्हटले होते. भाजपची लोकं ज्याप्रकारे निवडणूकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर फडणवीस यांनी प्रतिटोला लगावताना म्हटले की, गोव्यात शिवसेनेची लढाई ही ‘नोटा’शीच आहे, पण ती मतपत्रिकेतील नोटाशी आहे. नोटापेक्षा जास्त मतं मिळवण्यासाठी शिवसेनेला झगडावं लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here