हायलाइट्स:
- महिला व मुलींचे अश्लील व्हिडिओ
- आरोपी तरुण पोलिसांच्या जाळ्यात
- आरोपीला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
आरोपी तरुण ज्या वस्तीत राहायचा तेथीलच महिला व मुलींचे फोटो व व्हिडिओचे चित्रीकरण करून त्यांचे अश्लील पद्धतीने एडिटिंग करायचा. सदर तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं. त्यावेळी आपण २०१९ पासूनच हे कृत्य करत असल्याची कबुली त्याने दिली आहे.
चौकशी केल्यानंतर आरोपीने ३ महिला आणि १८ वर्षांखालील ४ मुली यांची नावे सांगितली. नराधम तरुणाने महिला आणि तरुणींचे अश्लील फोटो बनवण्यासाठी अनेक मोबाईल हँडसेट्सचा वापर केल्याचं स्पष्ट झालं आहे.. त्याचे व्हॉट्सअॅप तपासल्यानंतर तो अनेक परदेशी (ब्राझील, पाकिस्तान) ग्रुप्समध्ये सामील असल्याचं समोर आलं आहे. संबंधित ग्रुप्समध्ये अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल व्हायचे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत खडकी पोलीस तपास करत आहेत. आरोपीला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.