हायलाइट्स:
- मुंबईत पुन्हा करोनाने डोके वर काढले
- गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत नवीन करोनाबाधितांमध्ये वाढ
- बुधवारी दिवसभरात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज, बुधवारी आकडेवारी जाहीर केली. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या घटली होती. मात्र, आज, बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास पाच हजार रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत १६,४२० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा ९,५६,२८७ वर पोहोचला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात करण्यासाठी रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, मागील दोन दिवसांपासून काहीसा रुग्णसंख्यावाढीला ‘ब्रेक’ लागला होता. मात्र, मंगळवारी (मागील २४ तासांत) करोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. काल राज्यात ३४ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मंगळवारी ३४,४२४ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर २२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १८, ९६७ रूग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६६, २१, ०७० करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके झाले आहे. राज्यात मंगळवारी (गेल्या २४ तासांत) २२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २. ०२ टक्के आहे.
ओमायक्रॉन | ‘मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, पण केसेस वाढत गेल्या तर…’ – डॉ. राहुल पंडित
>> २४ तासांत बाधित रुग्ण – १६४२०
>> २४ तासांत बरे झालेले रुग्ण – १४६४९
>> बरे झालेले एकूण रुग्ण – ८३४९६२
>> बरे झालेल्या रुग्णांचा दर – ८७ टक्के
>> एकूण सक्रिय रुग्ण – १,०२,२८२
>> दुपटीचा दर – ३६ दिवस, कोविड वाढीचा दर (५ ते ११ जानेवारी ) – १. ८५ टक्के