corona update in maharashtra: Corona Update in Maharashtra : करोनानं धास्ती वाढवली; राज्यभरात रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, ‘ही’ आहे ताजी स्थिती – corona update in maharashtra 46723 covid 19 new cases reported in state today
गेल्या २४ तासांत राज्यात ४६ हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद
राज्यात ३२ करोना मृत्यू
एकट्या मुंबईत १६ हजारांहून अधिक रुग्ण
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून करण्यासाठी रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, आज, बुधवारी करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आज, राज्यात करोनाच्या ४६,७२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. (महाराष्ट्रात कोरोना अपडेट) मागील दोन दिवसांची आकडेवारी बघितली तर, करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसत होते. मात्र, आज, बुधवारी करोनानं पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसते. आज, बुधवारी राज्यात ४६, ७२३ नवीन रुग्ण आढळले. तर ३२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत २८,०४१ करोना रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
एकट्या मुंबईत १६ हजार ४२०, तर पुणे मनपा हद्दीत ४ हजार ९०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.