हायलाइट्स:
- आंबा घाटात दरीत कार कोसळली
- चालक जागीच ठार
- साखरपा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद
विसावा पॉइंटवर उभारलेले लोखंडी ग्रील दोन वर्षापासून दुरवस्थेत आहे. ते मजबूत असते तर दुर्घटना टळली असती अशी चर्चा परिसरात सुरू होती.
आंबा घाटात विसावा या प्रेक्षणीय पॉईंटवर रस्ता सोडून कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी चालक जोशी कारमधून बाहेर फेकले गेले. कारपासून ४० फूट अंतरावर त्यांचा मृतदेह पडला होता. दुपारी बारा वाजता साखरपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबा व साखरपा येथील मदत पथकातील सदस्य झाडा झुडपाच्या आधार घेत दरीत उतरले. तब्बल चार तासानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, मदतकार्य पथकातील राहुल गायकवाड, राजू काकडे, आंबा येथील दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, सुनील काळे, राहुल बोंडे, अक्षय महाडिक, राजेश गायकवाड यांनी मृतदेह वर काढण्यास योगदान दिले. पाच वाजता मृतदेह साखरपा रूग्णालयात शवविच्छेदनास नेला. देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी.एस.आय. विद्या पाटील या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.