औरंगाबाद : करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा फटका आता सर्वच क्षेत्राला बसताना पाहायला मिळत आहे. तर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवाशी घटल्याने विमान रद्द होणे सुरूच आहे. औरंगाबाद मार्गावरील इंडिगोने १३ ते ३१ जानेवारीदरम्यान ३३ विमानाने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिगोकडून औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे इंडिगोचे दिवसभरात ४ विमानांची ये जा होते. काही दिवसांपूर्वीच इंडिगोचे सकाळी व सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली औरंगाबाद- दिल्ली विमान काही दिवस रद्द केले होते. त्यात आता आणखी काही दिवस आणि इतर मार्गांची वाढ झाली आहे.

करोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘असं’ केल्यास करोनाचा प्रसार होणार नाही
कारण, आता १३ जानेवारीपासून रोज एक ते दोन मार्गावरील विमानसेवा रद्द राहतील. २९ जानेवारी रोजी इंडिगोचे दिवसभरात एकही विमान उड्डाण करणार नाही. या दिवशी दिल्ली, मुंबई, हैदराबाद मार्गावरील सर्वच विमान रद्द राहणार आहे. त्यामुळे नेहेमीप्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. तर दिल्ली जाणाऱ्यांना आधी मुंबई आणि त्यानंतर तेथून दिल्ली असा पर्याय निवडावा लागणार आहे.

प्रवाशी घटल्याने घेतला निर्णय

औरंगाबाद मुंबई प्रवाशी नेहमीच असतात, मात्र औरंगाबाद-दिल्ली आणि औरंगाबाद-हैदराबाद मार्गावर प्रवाशी अधिक नसतात. त्यातच आता कोरोनामुळे प्रवाशी मोठ्याप्रमाणात घटले आहेत. त्यामुळे विमान कंपनीला मोजक्या प्रवाशी घेऊन जाण्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे या मार्गावरील विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

हिंगोली पालिकेची गांधीगिरी, शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार

2 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or but thank god, I had no issues. choose to received item in a timely matter, they are in new condition. you decide so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap louis vuitton outlet https://www.louisvuittonsoutletonline.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. maybe but thank god, I had no issues. prefer received item in a timely matter, they are in new condition. manner in which so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    jordans for cheap https://www.cheapjordanssneakers.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here