औरंगाबाद : कन्नड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण, करोना पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण आरोग्य विभागाला शोधूनही सापडत नाहीये. त्यामुळे या रुग्णांचा शोध घेण्याचे आव्हान तालुका आरोग्य प्रशासनासमोर उभे राहिले आहे. तर चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्याने हा सर्व गोंधळ उडाल्याच समोर आलं आहे.
झालं असे की, रुग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात करोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून, लक्षणे असलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. तर आरटीपीसीआर चाचणी करतांना रुग्णांचा मोबाइल क्रमांक घेतला जातो. या चाचणीचा अहवाल दुसऱ्या दिवशी येतो. करोनाचा फटका! इंडिगोचा १३ ते ३१ जानेवारीदरम्यान ३३ विमाने रद्द करण्याचा निर्णय पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना त्यांच्या क्रमांकाववर संपर्क करुन माहिती दिली जाते. तसेच उपचारासाठी पुढील कार्यवाही केली जाते. पण कन्नड शहरातील दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र क्रमांक चुकीचा असल्याने ते शक्य झाले नाही.
दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर पुढील उपचारासाठी आरोग्य विभाग त्यांचा शोध घेत आहे, पण संपर्क होत नाही. त्यामुळे आता या रुग्णांना प्रशासन कसे शोधणार हा प्रश्न आहे. तोपर्यंत या रुग्णांपासून किती जण संक्रमित होतील, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन तेथून काही माहिती मिळते का यासाठी प्रयत्न सुरू असल्याच आरोग्य विभागच म्हणणं आहे.