सकाळी १० ते ११.३० या वेळेत नामनिर्देशन पत्रांचे वितरण व ती स्वीकारणे, ११.३० ते ११.४० या वेळेत सादर नामनिर्देशन, पत्रांची छाननी होईल. दुपारी ११.४० ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलला बहुमत आहे. मात्र महाविकास आघाडी काय जादू करणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे

हायलाइट्स:

  • संतोष परब हल्लाप्रकरण आणि नितेश राणे यांच्यावर भूमिगत होण्याची वेळ आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली होती
  • या अटीतटीच्या लढतीत नारायण राणे यांनी बाजी मारली होती
  • हा विजय राणे कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे

सुरेश कोळगेकर, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाच्या प्रांताधिकारी बंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पड़ते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलला बहुमत आहे. मात्र महाविकास आघाडी काय जादू करणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळी १० ते ११.३० या वेळेत नामनिर्देशन पत्रांचे वितरण व ती स्वीकारणे, ११.३० ते ११.४० या वेळेत सादर नामनिर्देशन, पत्रांची छाननी होईल. दुपारी ११.४० ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. दुपारी १२ ते १२.३० वाजता मतदान होईल. त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होईल. तत्पूर्वी बुधवारी भाजप जिल्ह्या कार्यकारिणीच्या बेठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोणीही दगाफटका करू नये असा सज्जड दम दिला आहे. अध्यक्षपदासाठीचे नाव नारायण राणे जाहीर करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निकाल: राणे समर्थकांचा आनंद गगनात मावेना! म्हणाले, देवाचा कौलही साहेबांच्या बाजूने!
अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत आहेत. मात्र, महाविकासआघाडीकडून अद्याप नावं जाहीर झालेली नाहीत. या निवडणुकीत बँक संचालक मनीष दळवी याना मतदानाकरिता पोलिसांच्या सहकार्याने न्यायालयाकडे वकीलांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे मनीष दळवी मतदानास हजर राहतात का, हे पाहावे लागेल.
‘मी निवडणुकीचा पूर्णवेळ प्रचार केला असता तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल वेगळा लागला असता’
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एकूण जागा १९ जागांपैकी ११ जागा भाजपप्रणित सिद्धीविनायक पॅनल, तर ८ जागा तर महाविकासआघाडी प्रणित समृद्धी पॅनलकडे आहेत. त्यामुळे आता महाविकासआघाडी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही चमत्कार करुन दाखवणार का, हे पाहावे लागेल.

संतोष परब हल्लाप्रकरण आणि नितेश राणे यांच्यावर भूमिगत होण्याची वेळ आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली होती. अखेर या अटीतटीच्या लढतीत नारायण राणे यांनी बाजी मारली होती. हा विजय राणे कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या निकालाने किमान सिंधुदुर्गात तरी राणेंचं नाणं खणखणीत वाजत असल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभव पत्करावा लागला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विठ्ठल देसाई मनीष दळवी आणि अतुल काळसेकर निवडणूक रिंगणात
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here