नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. मोदींचा हा ६३वा ‘मन की बात’चा संवाद कार्यक्रम आहे. तर या वर्षात तिसऱ्यांदा मोदी आज ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. जगात आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. नेहमी प्रमाणे सकाळी ११ वाजता आकाशवाणी, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी अॅपवर हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जाईल.

करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला पुन्हा प्रेरणा देतील. करोनाच्या मुद्द्यावर मोदींनी यापूर्वीही देशाला संबोधित केलं आहे. मोदींच्या आजच्या ‘मन की बात’चे हिंदीतून प्रसारण झाल्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचे प्रसारण केले जाईल.

करोना व्हायरसा देशात प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. १४ एप्रिलला हा लॉकडाऊन संपणार आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी मोदींनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन केलं आहे. गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून नागरिकांनी अत्यावश्यक सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलंय.

करोना व्हायरसमुळे देशातील रुग्णांची संख्या आता एक हजारांच्या जवळपास गेली आहे. तर देशात आतापर्यंत २१ जणांना मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here