रोम, इटलीः जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने इटलीत हाहाकार उडाला आहे. इटलीसाठी शनिवार हा आणखी एक काळा दिवस ठरला. इटलीत शनिवारी करोनाच्या मृतांची संख्या वाढून १० हजारांवर गेली. जगभरातील मृतांपैकी एक तृतीयांश नागरिकांचा मृत्यू फक्त इटलीत झाला आहे. जगात आतापर्यंत ३० हजार नागरिकांचा करोनाने बळी घेतला आहे. यापैकी फक्त युरोपात २० हजार जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

अमेरिकेची भारताला २.९ मिलिअय डॉलर्सची मदत

करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने विविध देशांना २७४ मिलिअन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. लॅब उभारणं, करोना रुग्णं शोधून काढणं, निरीक्षणाखाली ठेवणं, आवश्य तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांसाठी अमेरिकेने ही मदत जाहीर केली आहे. यात अमेरिकेने भारताला २.९ मिलिअन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी ही माहिती दिलीय.

इटलीत करोनामुळे शनिवारी ८८९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे इटलीतील करोनाच्या मृतांचा आकडा १०, ०२३ वर पोहोचला आहे. इटलीत या आधी एका दिवसात ९७० नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला होता. हा करोनाच्या बळींचा एका दिवसातला सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. इटलीत ९२, ४७२ जण करोना पॉझिटिव्ह आहेत. यापूर्वी पहिल्या आठवड्यात एक-दोन वेळा आकडे घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण हा दिलासा फार काळ टिकला नाही.

करोनाने युरोपला विळखा

युरोपात स्पेनमध्ये करोनाने कहर केला आहे. आतापर्यंत तिथे ५, ८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये ७२, २८४ जणांना करोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये सर्वात वाईट स्थिती माद्रीदमध्ये आहे. जर्मनीत ५६, २०२ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तिथे आतापर्यंत ४०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये २, ५१७, ब्रिटनमध्ये १०१९ आणि हॉलंडमध्ये ६३९ जणांचा बळी गेला आहे.

करोनाच्या प्रादुर्भाने अमेरिकेला भरली धडकी

अमेरिकेत करोनाचे ११६०५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १,९३७ जणांना आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमरिकेतील परिस्थिती खूपच बिघडली आहे. यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल मोटर्स आणि फोर्ड सारख्या ऑटोमोबाइल कंपन्यांना व्हेंटिलेटर्स बनवण्याची सूचना केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here