औरंगाबाद न्यूज़ ‘ महाराष्ट्र live: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पैठण इथलं नाथमंदिर भाविकांसाठी २ दिवस बंद – nath mandir at paithan closed for 2 days for devotees on the background of omicron
औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. मात्र असे असताना धार्मिक स्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता, पैठण येथील संत एकनाथ महाराजांचं मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मकरसंक्रांतीला होणारी गर्दी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या नाथ मंदिरात दरवर्षी मकर संक्रातीला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. जिल्हाच नव्हे तर इतर जिल्ह्यांतूनही भाविक दर्शनासाठी पैठणमध्ये येत असतात. त्यामुळे यावेळी सुद्धा अशीच गर्दी होण्याची शक्यता असल्याने, नाथ मंदिर १४ आणि १५ जानेवारी या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचं करण्याचा निर्णय नाथ संस्थाने घेतला आहे. Coronavirus Update : राज्याची चिंता वाढली, २ करोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क हरवले रुग्ण संख्या चिंताजनक…
औरंगाबाद जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या धडकी भरणारी ठरत आहे. कारण, गेल्या १२ दिवसात २ हजार १७८ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, असे असताना धार्मिक स्थळावर होणारी गर्दी अजूनही कायम असून, बाजारपेठ सुद्धा गर्दीने भरलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत करोनाची रुग्ण संख्या आटोक्यात येण्याची शक्यता कमी असल्याचं अभ्यासक सांगतायत.