राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाटया लावण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये चढाओढ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाटया लावण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
हायलाइट्स:
- मुंबईच्या विलेपार्ले परिसरात गुरुवारी शिवसैनिकांकडून दुकानदारांना स्मरणपत्रे वाटण्यात आली
- या माध्यमातून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची आठवण व्यापाऱ्यांना करुन देण्यात आली
राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाटया लावण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये चढाओढ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (राज ठाकरे) यांनी या निर्णयाबद्दल महाविकासआघाडी सरकारचे अभिनंदन केले असले तरी हे श्रेय महाराष्ट्र सैनिकांचेच आहे, ते लाटण्याचा आचरटपणा कोणीही करु नये, असेही ठणकावून सांगितले आहे.
शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने मराठी पाट्यांचा निर्णय घेतला: संदीप देशपांडे
राज्य सरकारने दुकानांवर मराठी पाट्यांच्या सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला. रामायण वाचले असेल तर कुंभकर्ण बारा-बारा वर्षे झोपायचा, असे म्हणतात. हा सरकारचा जो कुंभकर्ण आहे, तो घरी १४ वर्ष झोपला होता. महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे मराठी पाट्यांचा निर्णय घेतला. आमची हरकत नाही, आम्ही त्याचे स्वागत करतो. या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी. १९६२ पासून कायदा होतो, आता पुन्हा आलाय. अंमलबजावणी नाही झाली तर मनसे खळखट्ट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून