हायलाइट्स:
- अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन
- जमावबंदीचे आदेश धुडकावून जमवली गर्दी
- शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा
- अंबरनाथ पोलिसांची धडक कारवाई
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीजवळील बोहोनोली गावाजवळ बुधवारी सकाळी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आयोजक आणि स्पर्धक तिथून पसार झाले होते.
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली असली, तरी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. त्यात सध्या करोनाचा वाढत प्रादूर्भाव पाहता राज्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र हे सगळे नियम धुडकावत शर्यती घेण्यात आल्या. शिवाजीनगर पोलिसांनी शर्यतींचे आयोजक किशोर पाटील, शिवा पाटील यांच्यासह ५० ते ६० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.