हायलाइट्स:

  • जगभरातील रुग्णसंख्येत वाढ
  • करोनाला रोखण्यासाठी बुस्टर डोसचा वापर
  • ‘वॅक्सझेव्हरिया’चा बुस्टर डोस अधिक प्रभावी : अॅस्ट्रेझेनेकाचा दावा

लंडन, यूके:

करोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं फैलावताना दिसून येतोय. अनेक तज्ज्ञांकडून करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असताना करोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ‘ओमिक्रॉन‘नं सर्वांनाच अडचणीत आणलंय. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं सध्या अनेक देशांत कोविड लसीचा तिसरा डोस अर्थात ‘बुस्टर डोस’ दिला जात आहे. कोविड लसीचा बुस्टर डोस करोना संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचं आतापर्यंत अनेक अभ्यासांतून समोर आलंय.

याच दरम्यान, फार्मास्युटिकल कंपनी ‘अॅस्ट्रेझेनेका‘(AstraZeneca) नं गुरुवारी आपल्या कोविड-१९ लस ‘वॅक्सझेव्हरिया‘वर (वॅक्सझेव्हरिया) केलेल्या चाचणीच्या प्राथमिक आकड्यांची माहिती जाहीर केलीय.

‘अॅस्ट्रेझेनेका’च्या अहवालानुसार, लसीचा तिसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस म्हणून ‘वॅक्सझेव्हरिया’चा डोस ओमिक्रॉन, बीटा, डेल्टा, अल्फा आणि गॅमा यांसह करोनाच्या इतर व्हेरियंटविरुद्ध अधिक उच्च प्रतिची सुरक्षा देताना अधिकाधिक अँटीबॉडी निर्माण करण्यास मदत करत आहे.

निष्काळजी राहू नका! जगभरातील रुग्णसंख्येत वाढ; WHO चा अहवाल
Corona Vaccine: ‘बुस्टर डोस’ नाही, ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी लशीची गरज : WHO
ऑक्सफर्ड विद्यापीठानं केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ‘अॅस्ट्रेझेनेका’नं ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांसोबत ही लस विकसित केली आहे. ‘वॅक्सझेव्हरिया’ लशीचा बुस्टर डोस वेगानं हातपाय पसरणाऱ्या नव्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटविरुद्ध प्रभावी असल्याचं गेल्या महिन्यात प्रयोगशाळेतील अभ्यासात आढळून आलं.

‘या महत्त्वाच्या अभ्यासातून असं दिसून येतंय की, ‘वॅक्सझेव्हरिया’चा तिसरा डोस याच लसीच्या दोन प्रारंभिक डोसनंतर किंवा mRNA किंवा निष्क्रिय लशीनंतर, कोविड-१९ पासून संरक्षण करू शकतो. तसंच कोविडविरुद्ध मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करतो, असं ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रमुख अँड्र्यू पोलार्ड यांनी म्हटलंय.

यापूर्वी, एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित ‘अॅस्ट्राझेनेका’ची लस आपल्या किंवा फायझर लशीच्या प्रारंभिक लसीकरणानंतर ‘बुस्टर डोस’ म्हणून दिला जातो, तेव्हा अँटीबॉडीत वाढ होत असल्याचं डिसेंबर महिन्यात एका ब्रिटीश चाचणीत आढळून आलं होतं. फायझर आणि मॉडर्ना यांनी बनवलेल्या mRNA लसींनी ‘बुस्टर डोस’ म्हणून अँटीबॉडीजला सर्वाधिक चालना दिली, असा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला.

Hareem Shah: सोशल मीडियावर पैशांचं प्रदर्शन, टिकटॉक स्टार अडचणीत
सात भारतीय येमेनच्या हुती बंडखोरांच्या ताब्यात, भारताची संयुक्त राष्ट्राकडे धाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here