हायलाइट्स:
- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
- लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना ट्रेलरने उडवले
- एका तरूणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
- ठाण्याहून मालवणकडे कारने जात होते तरूण
या भीषण अपघातात २२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरूण गंभीर जखमी झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून मालवणकडे कारमधून निघालेले तिघे तरूण मुंबई-गोवा महामार्गावर लघुशंकेसाठी थांबले. कार रस्त्याच्या कडेला लावून ते खाली उतरले. रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असतानाच, मुंबईकडून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारलाही जोरदार धडक दिली.
या अपघातात अमित कवळे (वय २२) या ठाण्यातील तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर टेरेन्स आणि रोहन जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अलिबाग वन विभागाच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचं बेमुदत उपोषण
नेमके काय घडले?
ठाण्यातील शुभम हा २२ वर्षीय तरूण मित्रांसोबत मालवणकडे कारने निघाला होता. सकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कंसाई गावच्या हद्दीत कारमधील तिघे तरूण लघुशंकेसाठी खाली उतरले. त्यांनी रस्त्याच्या कडेलाच कार थांबवली होती. त्याचवेळी मुंबईकडून आलेल्या भरधाव ट्रेलरने तिघांना उडवले. या अपघातात अमित याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे आणखी दोन मित्र रोहन आणि टेरेन्स हे गंभीर जखमी झाले. या दोघांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. काही वेळाने वाहतूक पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.