हायलाइट्स:
- सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द
- करोनाच्या प्रादुर्भावामुळे आयोजकांनी घेतला निर्णय
- सलग तिसऱ्या वर्षी रद्द झाला महोत्सव
शहरात वाढत असलेली करोना रुग्णांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावली यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी सांगितलं आहे.
पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी मंडळाची, कलाकारांची आणि रसिकांची प्रबळ इच्छा होती; परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, डिसेंबर २०१९ मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव झाला होता. मात्र करोना प्रादुर्भावामुळे २०२० आणि २०२१ या वर्षांतही हा महोत्सव झाला नाही.