हायलाइट्स:

  • व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • सापळा रचून आरोपींना पकडलं
  • ३ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यात सक्रीय असलेल्या व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीस कोल्हापूर पोलीस आणि वन विभागाने सापळा रचून पकडलं आहे. या टोळीकडील सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी, ५ मोबाईल, २ दुचाकी आणि चारचाकी असे ३ कोटी ५० लाखाचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. (व्हेल फिश उलट्या)

सांगली जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी विक्री करणारी टोळी सक्रीय होती. याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर वन विभागाने सापळा रचला. या विभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या मदतीने त्या टोळीशी संपर्क साधला. व्हेल माशाची उलटी खरेदी करण्यासाठी या टोळीला कोल्हापुरात बोलावण्यात आले.

Coronavirus In Delhi: राजधानी दिल्लीत करोनाचा स्फोट; रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ, गेल्या २४ तासांत…

दसरा चौकात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे हे ग्राहक बनून गेले. त्यांनी टोळीतील मुल्ला याला आपल्याकडील बॅगेतील पैसे दाखवले. पैसे पाहिल्यानंतर त्यांचा विश्वास बसला आणि यामुळे टोळीला पकडण्यात यश आले.

कोल्हापूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. संशयित विश्वनाथ नामदास, आलमशाह मुल्ला, उदय जाधव, रफिक सनदी, किस्मत नदाफ, अस्लम मुजावर यांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, या कारवाईमध्ये उपवनसंरक्षक आर. आर.काळे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील निकम, नवनाथ कांबळे, विजय पाटील, संदीप शिंदे, आर.एस.मुल्लानी, एस.एस.हजारे, पोलीस कर्मचारी प्रदीप भोसले यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here