औरंगाबाद : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ नामविस्तार दिन आहे. नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ प्रवेशद्वार विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. या दरम्यान आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले आहेत. मात्र अभिवादनासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या नियमाचे कोटेकोरपणे पालन करून अभिवादन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार निमित्ताने विद्यापीठ गेटवर दरवर्षी भीमसागर एकत्र येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतो. मात्र यावेळी कोरोनाची परिस्थिती पाहता गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे १७ वर्ष लढा द्यावा लागला, त्यानंतर १९९४ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले.

शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची ‘मेट्रो’ लढाई, दोन जेष्ठ नेते आमने-सामने

१७ वर्षांचा लढा…

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव देण्यासाठी भीम सैनिकांना तब्बल १७ वर्षे लढा द्यावा लागला. १९७२ साली दलित पॅंथरची स्थापना झाली. गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, यासारख्या काही मागण्यांसाठी दलित पँथरचं आंदोलन सुरु होतं. त्याबरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावे, ही मागणीने जोर धरला. १९७४ च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली.

मग या मागणीसाठी तरुण रस्त्यावर उतरले अनेक मोठं-मोठी आंदोलने झाली. या अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. २७ जुलै १९७८ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली. मात्र दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्ताराला विरोध दर्शवला होता. पँथरला निर्भेळ नामांतर हवं होतं. रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरु झाल्या. एक-दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता. शेवटी १४ जानेवारी १९९४ ला एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ तर दुसऱ्याला ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड’ अशी विस्तारित नावं दिली गेली. त्यामुळे १४ जानेवारीला मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा केला जातो.

ठाकरे सरकार, जागे व्हा, तिसरी लाट आली, नागपूर खंडपीठाने सरकारला सुनावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here