औरंगाबाद : इन्स्टाग्रामच्या माध्यमातुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना वैजापूर शहरात उघडकीस आली. याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील करण भाऊसाहेब जाधव (१९) या तरुणाविरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमाखाली बुधवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही शहरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत आहे. आरोपी करण याचा मित्र हा अल्पवयीन मुलीच्या घरा शेजारी राहत असल्याने त्यांचं मित्राकडे येणे जाणे सुरु असायचे. दरम्यान, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपीने पीडित मुलीशी ओळख वाढवली व तिला भेटण्यासाठी तो वारंवार तिचा पाठलाग करत भेटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मुलीला त्याला भेटण्याची इच्छा नव्हती.

शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची ‘मेट्रो’ लढाई, दोन जेष्ठ नेते आमने-सामने
इच्छा नसताना करण हा भेटण्यासाठी त्रास देत असल्याने मुलीने आईला व काकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी करण व त्यांचे वडील भाऊसाहेब जाधव यांना बोलावून समजाऊन सांगितले. मात्र, तरीही करणकडून मुलीच्या घरासमोर चकरा मारणे व वारंवार पाठलाग करणे थांबले नव्हते.

पीडित मुलगी बुधवारी शाळेत जात असतांना आरोपीने पुन्हा तिचा पाठलाग करणे सुरू केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने संध्याकाळी घरी आल्यानंतर याबाबत आईला सांगितले. त्यानंतर मुलीने आई वडीलांसोबत थेट पोलीस ठाणे गाठून करण जाधव यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादकरांनो कोरोना आता प्रत्येकाच्या घरापर्यंत आलाय; गुरुवारी तब्बल ५७३ रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here