या अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त खबर मंडणगड पोलीस निरीक्षण शैलजा सावंत यांना मिळाली होती. त्यावरुन १३ जानेवारी रोजी गुरुवारी ही मोठी कारवाई मंडणगड पोलिसांनी केली आहे. या कारवाईने दापोली मंडणगड परिसरातील पानमसाल्याच्या नावाखाली अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईत पुढील स्वरुपाचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. १८ हजार सातशे बारा रूपये किंमतीची विमल पान मसाला केशरी रंगाचे ४२ पाकीट,४ हजार सहाशे ऐशी रूपये किंमतीची केसरयुक्त विमल पान मसाला फिकट जांभळ्या रंगाचे पॅकीग असलेले ३९ पाकीट,६ हजार पाचशे पंचेचाळीस रूपये किंमतीची केसरयुक्त विमल पान मसाला फिकट जांभळा व लाल रंगाचे पॅकींग असलेले ३५ पाकीट, ११ हजार पंचावन्न रूपये वि-२ तंम्बाखू निळा लाल रंगाचे पॅकींग असलेले ३५ पाकीट, एक हजार दोनशे रुपये किंमतीची वि-१ तम्बाखू हिरव्या रंगाचे पॅकीग असलेली ४० पाकीट, नऊशे चोवीस रूपये वि- १ तंम्बाखू केशरी रंगाचे पँकींग असलेले ४२ पाकीट या वस्तूंचा समावेश आहे.
या कारवाईत दोन लाख पन्नास हजार रुपये, एक महिंद्रा मँक्झिमो चार चाकी गाडी क्रमांक एम.एच ०८ / डब्लू / २६०७ ही ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी म्हणून.भा.द.वि. ३२८, २७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची फिर्याद पोलीस हवालदार धनंजय शांताराम सावंत यांनी दाखल केली असून अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times