मुंबई: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून आतापर्यंत राज्यातील रुग्णांच आकडा १८६ वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या भीतीनं संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असतानाही वाढता जाणारा रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. जाणून घेऊया ‘करोना’च्या संदर्भातील दिवसभराच्या ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
>> औरंगाबाद: गंगापूर शहरात सर्व चौकातील रस्ते दोरी बांधून बंद… नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये असं पोलीस निरीक्षक एम. सुरवसे यांचं आवाहन
>> औरंगाबाद: जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी कायम
>> पिंपरी-चिंचवड: चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या पाच जणांना आज डिस्चार्ज मिळणार; महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
>> पुण्यात आतापर्यंत ३६ रुग्ण; त्यापैकी १० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडले
>> राज्यात आतापर्यंत करोनाच्या २६ रुग्णांना डिस्चार्ज
>> कालच्या एका दिवसात वाढले २२ रुग्ण
>> करोनचा कहर सुरूच; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १८६ वर
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times