हायलाइट्स:

  • दुबईच्या आकाशात दिसली फ्लाईंग कार!
  • फ्युचरिस्टिक फ्लाईंग हायपर कार
  • गाडीच्या उड्डाणाचा व्हिडिओ सार्वजनिक

दुबई, संयुक्त अरब अमिरात :

संयुक्त अरब अमिरातीत रस्त्यांवर दिसणारं ट्राफिक येत्या काही वर्षांत अगदी कमी होईल असं दिसतंय. याचं कारण म्हणजे, राजधानी दुबईत नुकतीच एका ‘उडणारी कार‘ची यशस्वी चाचणी घेण्यात आलीय. हवेत उडणारी ही फ्युचरिस्टिक फ्लाईंग हायपर कार जमिनीपासून ३००० फुटांच्या उंचीवर जवळपास २१७ किलोमीटर प्रती तासाच्या वेगानं उडू शकते.

पहिल्या यशस्वी चाचणीनंतर लवकरच दुबईच्या आकाशात मोठ्या संख्येत गाड्या उडताना दिसू शकतात.

हवेतून उडणारी ‘वॉलर EVTOL प्रोटोटाइप कार‘लंडन-आधारित स्टार्टअप’बेलवेडेरे इंडस्ट्रीज‘कडून निर्माण करण्यात आलीय.

पूर्णपणे इलेक्ट्रिक वॉलर EVTOL प्रोटोटाइपची पहिली उड्डाण चाचणी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडली होती. परंतु, या गाडीच्या उड्डाणाचा व्हिडिओ मात्र नुकताच सार्वजनिक करण्यात आला आहे.

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, वॉलर EVTOL कारच्या हाफ-स्केल व्हर्जननं १३ फूट (४ मीटर) उंचीवर ४० किलोमीटर प्रति तास (२५ mph) वेगानं उड्डाण केलं.

Hareem Shah: सोशल मीडियावर पैशांचं प्रदर्शन, टिकटॉक स्टार अडचणीत
New Planet: अवकाशात आढळून आला ‘बटाट्या’सारखा ग्रह, शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का
Belvedere Voller EVTOL प्रोटोटाइप खाजगी मालकांना आपल्या गाडीऐवजी वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आलंय. सायकलस्वार आणि पादचाऱ्यांसाठी जमिनीवर जागा मोकळी करण्यासाठी तसंच रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी अशा पद्धतीची गाडी निर्माण करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलंय.

२०२३ पर्यंत ही गाडी फूल स्केल प्रोटोटाईप स्वरुपात तयार होऊ शकते. तर या गाडीचं फायनल मॉडेल २०२८ पर्यंत बनवण्याची योजना आहे. खासगी मालकांसाठी २०३० पर्यंत ही गाडी बाजारात उपलब्ध करण्याची योजना कंपनीनं आखलीय. हवेत उडणारी ही गाडी ‘उबर’ प्रमाणेच ‘ऑन डिमांड ट्रान्सपोर्ट’ सुविधाही उपलब्ध करून देऊ शकते.

ही जगातील पहिलीच अशी फ्लाईंग कार आहे ज्यात मोठ-मोठे पंखे किंवा ब्लेडसहीत इंजिन नाहीत, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.

बाजारात या गाडीची नेमकी किंमत काय असेल? याचा अंदाज अद्याप कंपनीकडून व्यक्त करण्यात आलेला नाही.

Imran Khan: ‘प्लेबॉय’ इम्रान खान सरकारकडून ‘कंडोम’वर टॅक्स, विरोधकांनी काढला चिमटा
आता, उत्तर कोरियाकडून ‘हायपरसोनिक मिसाईल’ची यशस्वी चाचणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here