हायलाइट्स:

  • इराकमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला
  • बगदादच्या सुरक्षित भागावर रॉकेट हल्ला
  • अमेरिकाला टार्गेट करून ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांची मालिका

बगदाद, इराक :

इराकची राजधानी बगदाद स्थित अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला घडवून आणण्यात आलाय. अमेरिकन दूतावासाला निशाण्यावर घेत तीन रॉकेट सोडण्यात आल्याची माहिती इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलीय. यातील दोन रॉकेट दूतावासाजवळ पडले तर एक रॉकेट मात्र याच परिसरात असलेल्या एका शाळेवर जाऊन कोसळलं. या रॉकेट हल्ल्यात एका मुलासहीत एक महिला जखमी झाल्याची माहिती इकारच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिलीय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

उल्लेखनीय म्हणजे, बगदादमधील अत्यंत सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात अमेरिकेचं हे दूतावास स्थित आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून इराकमध्ये अमेरिकेच्या उपस्थितीला लक्ष्य केलं जातंय. अमेरिकाला टार्गेट करून ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांची मालिकाच इथे सुरू असल्याचं दिसून येतंय.

Rishi Sunak: नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान?
PM Imran Khan: आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवलं, इम्रान खान यांना घरचा आहेर
अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणी जनरल कासिम सुलेमानी आणि इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहांदीस यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच हे हल्ले घडवून आणले गेलेत.

या हल्ल्यांत जीवितहानी झाली अथवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याआधी, गेल्या गुरुवारी इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करून अनेक हल्ले घडवून आणण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात इराकमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करून अनेक हल्ले करण्यात आलेत. यातील काही हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून इराण-संलग्न ‘मिलिशिया गटा’ला जबाबदार धरण्यात आलंय.

Watch Video: ३००० फूट उंचीवर २१७ किमी वेगानं उडणारी ‘फ्लाईंग कार’!
Hareem Shah: सोशल मीडियावर पैशांचं प्रदर्शन, टिकटॉक स्टार अडचणीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here