वाचा:
सुरेश अहिरे असं चावा घेणाऱ्या मुख्याध्यापकांचं नाव आहे. त्यांनी ब्रह्मचैतन्य राजगुरू या शिक्षकाच्या हाताचा चावा घेतला आहे. हे दोघेही नगरसूल येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत आहेत. शाळेतील कॅटलॉगपासून त्यांच्यात सुरू झालेला वाद चावा घेण्यापर्यंत गेला. यामध्ये राजगुरू यांच्या अंगठ्यातून रक्तस्त्राव झाल्याने ते जखमी झालेले आहेत. राजगुरू यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्याध्यापक अहिरे हे दारू प्यायलेले होते. मी त्यांना दिलेल्या कॅटलॉगमध्ये चुका असल्याचं सांगून अहिरे यांनी स्वत:साठी व त्यांच्या मित्रासाठी जेवायला घालण्याची मागणी माझ्याकडं केली. माझ्याकडं पैसे नसल्यानं मी त्यांना नकार दिला. त्यावरून त्यांनी माझा डावा हात धरून अंगठा चावला. मी त्यांना जोराचा हिसका देऊन स्वत:ला सोडवले आणि तिथून थेट उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतले, असं राजगुरू यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाचा: