हायलाइट्स:
- जळगाव शहरात धक्कादायक घटना
- १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
- क्षुल्लक कारणातून उचललं टोकाचं पाऊल?
रमेश सुकलाल राजपूत (रा. कांचन नगर) हे पत्नी, मुलगा यश आणि मुलगी सोनी यांच्यासह वास्तव्याला आहेत. रमेश राजपूत हे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत कामानिमित्त गेले होते, तर त्यांची पत्नी देखील सकाळी स्वयंपाक करून घरकामासाठी बाहेर गेल्या. मुलगा यश आणि मुलगी सोनी हे दोघेच घरी होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास यश राजपूत याने घराच्या वरच्या खोलीत जाऊन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
हा प्रकार बहीण सोनीच्या लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नातेवाईकांच्या मदतीने यश याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. या लहानग्याने आत्महत्या करण्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, रुग्णालयातत मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.