दुसऱ्याच दिवशी पालिकेच्या लहानशा अॅपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात. मग १० ते १२ तासांमध्ये जादूची कोणती कांडी फिरली, असा सवाल भाजपचे विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते.
हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते
- भाजपच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपला अप्रत्यक्ष टोले लगावले. अनेकजण जरासं काही झालं की, महानगरपालिका आणि नगरेसवकांवर खापर फोडतात. सातत्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण फक्त प्रश्न विचारायला फार अकलेची गरज नसते, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या बैठकीला नसले म्हणून काय बिघडलं; राऊतांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नसले म्हणून काही बिघडत नाही. देशात सर्वाधिक सुरळीत कारभार हा महाराष्ट्रातच सुरु असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (संजय राऊत) यांनी केले. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीतील उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल. भाजपचे नेते यावरुन टीका करत आहेत. पण त्यांच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलं आहे. ऐनवेळी वेगळी कामं निघू शकतात. पंतप्रधानही अनेक बैठकांना गैरहजर राहतात. कालच्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. त्यांना कमी का लेखता, असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून