हायलाइट्स:
- शहरातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा
- पोलिसांनी ५ आरोपींविरोधात दाखल केला गुन्हा
- पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदारांच्या रांगा
बार्शी शहरातील उच्च शिक्षित गुंतवणूकदारांना आलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून आकर्षक व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे.
सदरची फर्म ही विशाल अंबादास फटे आणि त्याच्या परिवारातील सदस्य राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे सर्वजण चालवत होते. या फसवणूक प्रकरणी फटे परिवार (रा.उपळाई रोड बार्शी) यांच्या विरोधात भा.द. वि.कलम ४२० , ४०९, ४१७ , ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधीनियम १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बार्शी पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्या आहेत.
या प्रकरणात आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून आता संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे. या फसवणुकीची व्याप्ती, त्यांचे एजंट्स, गुंतवणूकदारांची संख्या यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती सोलापूरचे अप्पर अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली आहे.