हायलाइट्स:
- मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून केला खून
- आरोपीला पकडण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश
- आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदत्त चंद्रकांत सकट (वय ३४, अप्पर ओटा, बिबवेवाडी)असं आरोपीचं नाव आहे. १० जानेवारी रोजी महेश सोसायटी चौकात असलेल्या राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये विशालचा मृतदेह आढळून आला होता.
बिबवेवाडी पोलिसांना ही माहिती मिळल्यानंतर गुन्हेगाराला शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली होती. कारण विशाल कुठलेही काम करत नव्हता आणि मोबाईलही वापरत नव्हता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे काहीसे अवघड होते. परंतु पोलिसांनी विशालच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडून माहिती घेतली आणि घटना घडलेल्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर तसंच सीसीटीव्ही फुटेजवरून या हत्या प्रकरणातील आरोपीचा छडा लावला.
का केली हत्या?
पोलिसांच्या गुप्त यंत्रणेकडून आरोपी शिवदत्त याच्याविषयी माहिती मिळवण्यात आली. तो गॅस गोडाऊन परिसरात वावरत असल्याचं कळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विशाल ओव्हाळ हा माझा मित्रच होता. आम्ही एकत्र दारू प्यायल्यानंतर झालेल्या वादातून मी त्याची हत्या केली, अशी कबुली शिवदत्त सकट याने दिली आहे.