औरंगाबाद : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त करोना चाचण्या व्हाव्यात या उद्देशाने महापालिकेने शहरातील ३९ खासगी लॅबला अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. यापैकी पंधरा लॅब चालकांनी आतापर्यंत एकही चाचणी केली नसल्याचे निदर्शनास आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने या पंधरा लॅबला नोटीस बजावली आहे. करोना चाचणी करण्याची परवानगी रद्द का करण्यात येऊ नये याचे उत्तर द्या असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त लॅबमधून अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याची मान्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील ३९ खासगी लॅबला परवानगी दिली. करोना चाचणीसाठीचे शुल्कदेखील निश्चित करुन दिले. परंतु परवानगी घेतल्यानंतरही पंधरा लॅब चालकांनी एकही करोना चाचणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लॅब चालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

दुकानांच्या मराठी पाट्यात गैर काय ?, सरकारी निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया
नोटीस बजावण्यात आलेल्या लॅबमध्ये एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी पुंडलिकनगर, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल, अमृत पॅथालॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम, युनिसेफ पॅथालॉजी लॅब भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-२ या लॅबचा समावेश आहे.

पोलीस भरती प्रक्रियेला लागली कीड; परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here