औरंगाबाद : करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फ्रंट लाईन वर्कर यांच्या कामचं मोठं कौतुक झालं. ज्यात आरोग्य विभागाचं मोठं योगदान आहे. पण फक्त कौतुकाने घर चालत नाही, असं म्हणण्याची वेळ शासकीय रुग्णवाहिका चालकांवर आली आहे. कारण, गेल्या चार महिन्यांपासून या रुग्णवाहिका चालकांचे पगार थकले असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आजही हजारो लोकांना रोज जीवनदान देणारी ठरत आहे. विशेष म्हणजे करोना काळात या रुग्णवाहिकेचं योगदान महत्वाचं ठरलं. पण या रुग्णवाहिकावर काम करणाऱ्या चालकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही. आता पुन्हा एकदा गेल्या चार महिन्यांपासून या चालकांचे वेतन थकले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अशा जवळपास ३३ रुग्णवाहिका असून यावरील चालकांचे पगार थकले आहेत.

दुकानांच्या मराठी पाट्यात गैर काय ?, सरकारी निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया
अनेकदा आंदोलन केलं पण…

वेतन थकल्यामुळे अनेकदा १०८ रुग्णवाहिकावरील चालकांनी आंदोलन केली आहेत. मात्र आंदोलन केल्यानंतर एखाद्या-दुसऱ्या महिन्याचे पगार देऊन डोळे पुसण्याचे काम केलं जातं. मात्र त्यानंतर पुन्हा वेळेवर पगार दिले जात नाही. त्यामुळे एकीकडे करोना योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि दुसरीकडे वेतन थांबवून अडवणूक करायची यामुळे चालक हतबल झाले आहेत.

खासगी लॅबला नोटीस, चाचणी न केल्याने परवानगी रद्द करण्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here