यानंतर का पुन्हा पोलिसांच्या चमुने वर्धा आणि नागपूरच्या फॉरेन्सिक चामुंच्या मदतीने पुन्हा परिसरातील तपासणी केली. दरम्यान, रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गॅस चेंबरमधून पुन्हा एक कवटी आढळली तर तेथील गटारामधून काही बायोमेडिकल वेस्ट सुद्धा जप्त केले आहे. रुग्णालयच्या बाथरूमध्ये फॉरेन्सिकच्या चमुला रक्ताचे डागही दिसले आहेत. त्या रक्ताचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तपासात आणखी काय पुढे येतं हे पाहणं महत्वाचं आहे.
वर्धा न्यूज तस्करी लिव्ह: कदम रुग्णालयात सापडल्या १२ कवट्या, ५४ हाडं; गर्भपात प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक खुलासा – wardha news 12 skulls 54 bones found in kadam hospital shocking revelation from police in abortion case
वर्धा : वर्धेच्या कदम रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या रुग्णालय परिसरात काल पुन्हा पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या साहाय्याने शोधकार्य केले. या शोधकार्यात पुन्हा एक कवटीसारखा अवयव आढळला असल्याची माहिती आहे. आतापर्यंत या परिसरातून १२ कवट्या आणि ५४ हाडं आढळली आहे.