कठोर निर्णय घेतल्यानं गरीब जनतेचं जगणंही कठीण झालंय, याची मला जाणीव आहे पण भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी आणखी कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे अशा प्रसंगात अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले, असंही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.
करोनाशी लढाई म्हणजे जीवन मरणाशी लढाई आहे. करोनापासून वाचण्यासाठी लष्मणरेषा पाळावीच लागेल, असं म्हणत पुन्हा एकदा पंतप्रधानांनी नागरिकांना लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन केलं.
यासोबतच करोनावर मात करणाऱ्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. करोना व्हायरस पीडित रामगप्पा तेजा यांनी करोनावर मात केलीय. त्यांनी आपला अनुभव पंतप्रधान मोदींसमोर कथन केला. ‘मी कामाच्या निमित्तानं दुबईला गेलो होतो. परतलो तेव्हा करोनाची बाधा झाली होती. पहिल्यांदा मी घाबरलो परंतु, डॉक्टर आणि नर्सेसनं मला धीर दिला’, असं करोनाच्या संकटातून बाहेर पडलेल्या रामगम्पा तेजा यांनी म्हटलं.
त्यानंतर, ‘माझ्यानंतर माझ्या कुटुंबातील इतर सहा जणांना करोनाची लागण झाली होती. आम्हाला आग्रा ते दिल्ली सफदरजंग रुग्णालयाच्या ऍम्बुलन्सनं पाठवण्यात आलं. आम्ही १४ दिवस रुग्णालयात होतो. या दरम्यान डॉक्टर आणि नर्सेसनं आमची योग्य ती काळजी घेतली’, असा अनुभव करोनावर मात करणाऱ्या अशोक कपूर यांनी व्यक्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times