औरंगाबाद न्यूज लाइव्ह: ‘या’ अॅपने एका झटक्यात १० लाख खात्यातून गायब, तुमच्याही मोबाईलमध्ये आहे का? – aurangabad news mobile app disappears from 10 lakh accounts
औरंगाबाद : मोबाईमध्ये एक अॅप डाउनलोड करणं सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराला चांगलच महागात पडलं आहे. पैठण तालुक्यातील चानकवाडी येथील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार यांना सेवा समाप्तीनंतर मिळालेल्या १० लाख २४ हजार रुपयांच्या रक्कमेवर ऑनलाइन पद्धतीने गंडा घालून, हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पैठण पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील चानकवडी येथील पोलीस विभागातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार तुकाराम छगनराव मोहिते यांनी आपल्या मोबाईलमध्ये एसबीआय अॅप घेण्यासाठी गुगलवर सर्च करून एसबीआय बँकेचे हेल्पलाईन नंबर प्राप्त केला. या नंबरवर संपर्क केला असता लगेच मोहिते यांना काही मिनिटातच एसबीआय बँकेचा अधिकारी बोलतो म्हणून फोन आला. कदम रुग्णालयात सापडल्या १२ कवट्या, ५४ हाडं; गर्भपात प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक खुलासा फोन केलेल्या समरोच्या व्यक्तीने मोहिते यांना मोबाईल वर any desk नावाचे अॅप डाऊनलोड करण्याचे सांगून, आयडी कोड नंबर विचारून बँक खात्यात जमा केलेल्या एकूण १० लाख २४ हजार रुपयांची रक्कम परस्पर ऑनलाइन पद्धतीने पळवली. बँकेतून पैसे कमी झाल्याचं लक्षात येताच मोहिते यांनी पैठण पोलिसात धाव घेतली.
यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ बँकेला माहिती देऊन मोहिते यांच खात ब्लॉक करायला लावले. त्यामुळे दोन लाख ४५ हजार वाचले. त्यानंतर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४२०, सह ६६, ६६ माहिती-तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.