हायलाइट्स:

  • कर विभागाची मालमत्ताधारकांवर ६०० कोटी रुपयांची थकबाकी
  • मार्च अखेर पर्यंत १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य

प्रदीप भणगे, उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिका कर विभागाची मालमत्ताधारकांवर ६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे .त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने वसुलीसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल ६५ हजार करबुडव्यांना कर भरण्यासाठी नोटीसा धाडल्या आहेत आणि २१ दिवसांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करणार असा सज्जड दमच करबुडव्यांना दिला आहे.

उल्हासनगर महानगरपालिका कर विभागाची येथील मालमताधारकांनवर ६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.त्यात चालू वर्षाची १२० कोटींची मागणी आहे. दरम्यान १८० कोटी जुनी थकबाकी आणि या थकबाकीवर ३०० कोटी रुपयांचा दंड आहे. तर जवळपास ६० हजार करबुडव्यांवर ४५० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी मार्च अखेर पर्यंत १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले असून दोन दिवसातच ४७ कोटी रुपयांची वसूली केली आहे.तर अद्याप अडीच महिने असून ६५ हजार करबुडव्यांना वॉरंट बजावण्यात आले आहे.२१ दिवसांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरा, अन्यथा मालमत्ता जप्त केला जाईल असा सज्जड दमच महानगरपालिकेने करबुडव्यांना दिला आहे.

नागरिकांची मालमत्ता सिल करून जप्त करणे, हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही. मात्र महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत हे मालमत्ता कर असून मालमत्ता कराच्या निधीवर महानगरपालिका चालते. त्यामुळे हि कठोर पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपला मालमत्ता कर भरून कारवाई पासून वाचून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी केले आहे.

मालमत्ता करमाफीचे मृगजळ
मुंबईत ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना खास भेट दिली होती. मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील तब्बल १६ लाख कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे.

वापर व्यावसायिक; कर मात्र निवासीच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here