राज्य सरकारने दुकाने आणि १० पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. पण विशेष वर्गातील लोक या निर्णयाला विरोध करत आहेत, ही बाब योग्य नाही.

नवाब मलिक (1)

राज्य सरकारने दुकाने आणि १० पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे

हायलाइट्स:

  • सरकारच्या प्रत्येक नियमाची अंमलबजावणी करणे हे नागरिक आणि संबंधित आस्थापनांचे कर्तव्य असते
  • या निर्णयाला विशिष्ट भागातील भाजपचे समर्थक विरोध करताना दिसत आहेत

मुंबई : राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला भाजपच्या काही समर्थकांकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (नवाब मलिक) यांनी केला. मात्र, एकदा राज्य सरकारने कायदा केला की तो निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असतो, असेही मलिक यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले.

राज्य सरकारने दुकाने आणि १० पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. पण विशेष वर्गातील लोक या निर्णयाला विरोध करत आहेत, ही बाब योग्य नाही. सरकारच्या प्रत्येक नियमाची अंमलबजावणी करणे हे नागरिक आणि संबंधित आस्थापनांचे कर्तव्य असते. परंतु, या निर्णयाला विशिष्ट भागातील भाजपचे समर्थक विरोध करताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश लोकांनी हा निर्णय स्वीकारला आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
Marathi boards on shops: दुकानाच्या पाटीवर मोठ्या अक्षरात मराठीत नाव लिहायचे की नाही हे आम्ही ठरवू: विरेन शाह
यावेळी नवाब मलिक यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मणीपूर, उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी मणीपूरमध्ये आमची काँग्रेसशी तर उत्तर प्रदेशात आम्ही समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. गोव्यातील निर्णय अद्याप बाकी आहे. पण बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेस गेल्यावेळप्रमाणे स्वबळावरच लढेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. लवकरच पक्षाच्य माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जातील, असेही मलिक यांनी म्हटले.
Gunaratna Sadavarte : दुकानांवर मराठी पाट्या; गुणरत्न सदावर्ते देणार ठाकरे सरकारच्या निर्णयाला ‘चॅलेंज’
पाटी बदलायची की दुकानाच्या काचा, हे तुम्हीच ठरवा; मनसेचा इशारा

राज्यातील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी पाटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करु पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) ‘खळखट्याक’चा इशारा देण्यात आला आहे. ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे, त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की, दुकानाच्या काचा बदलण्याचा??, असे सूचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे दुकानांवर मराठी पाट्या लावण्यास विरोध करणाऱ्यांविरोधात मनसेकडून पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: महाराष्ट्र सरकारच्या दुकानांच्या निर्णयावर मराठी फलकांना भाजप समर्थकांचा विरोध : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here