बीड : सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरणही तापलेलं दिसून येतं. सोशल मीडियावर आणि राजकीय पटलावर यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

महाविकास आघाडीकडून अभिनेते किरण माने यांना पाठिंबा देण्यात येतोय तर यावरून भाजपवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. यासंबंधी आज अभिनेते किरण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या सगळ्या भरती सोशल मीडियावर मात्र वेगळाच कल्ला सुरू आहे. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी; याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल, अशी टीका करण्यात येत आहे.

PF धारकांसाठी महत्त्वाची बातमी, करोनाच्या धोक्यामुळे आयुक्तांचा मोठा निर्णय

यावरती नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. ‘आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून किरण मानेंसारखा अभिनेता राजकीय विषयावर व्यक्त झाला म्हणून राजकीय दबावाला आणि ट्रोलिंगला बळी पडून @StarPravahने त्यांना काढून टाकणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण आहे.’ अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
PF धारकांसाठी महत्त्वाची बातमी, करोनाच्या धोक्यामुळे आयुक्तांचा मोठा निर्णयदरम्यान, यावर अनेक नेत्यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, या सगळ्या वादानंतर ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे मालिकेतून काढण्यात आलेले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणांमुळे कारवाई करण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here