मुंबई- टीव्हीवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा रिअॅलिटी शो नव्या सीझनसह परतत आहे. आज १५ जानेवारीपासून सुरू होणार्या या कार्यक्रमाचे , आणि परीक्षक असतील आणि अर्जुन बिजलानी या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. निर्माते दररोज या शोच्या वेगवेगळ्या भागांचे प्रोमोज रिलीज करत आहेत, ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धक आपल्या टॅलेंटने सर्वांना थक्क करताना दिसत आहेत.
असाच एक प्रोमो समोर आला, ज्यामध्ये एका मुलीने लता मंगेशकर यांचे ‘तू जहाँ जहाँ चलेगा’ हे गाणे गायले. इशिता विश्वकर्मा नावाच्या या स्पर्धकाने ज्या पद्धतीने ते गाणे गायले, त्याने सर्वांनाच भावुक केले. शिल्पा शेट्टीपासून बादशादपर्यंत सारेच भावुक झाले. बादशहाला तर आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि तो रडला. त्यानंतर शिल्पा आणि किरण खेर यांनी त्याला शांत केले.
यानंतर शिल्पा स्टेजवर जाते आणि इशिताचं कौतुक करतं तिला मिठी मारते. मनोज मुंतशीर हे देखील या शोचा एक महत्त्वाचा भाग आहे. शिल्पा शेट्टी अनेकदा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या सेटवरील मजेशीर बीटीएस व्हिडिओ शेअर करत असते, ज्यांना चाहत्यांकडून खूप पसंती दिली जाते.