हायलाइट्स:

  • मुंबईतील करोना लाट ओसरतेय
  • नव्या बाधितांची संख्या उतरणीला
  • सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या २ ते ३ हजारांनी घटली
  • रुग्णालयातील ८० टक्के खाटा रिक्त

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या तिसऱ्या लाटेने मुंबईची चिंता वाढवली असतानाच सलग तिसऱ्या दिवशी नव्या करोना रुग्णांच्या संख्येचा आलेख उतरला आहे. शनिवारी मुंबईत १० हजार ६६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन ते तीन हजार रुग्णांची संख्या घटली आहे.

मुंबईत नियंत्रणात आलेली करोनाची लाट डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा झपाट्याने वाढू लागली होती. आहे. मागील १५ दिवसांतील आकडेवारी लक्षात घेतली तर रुग्णांचा आलेख चढताच राहिला आहे. एक डिसेंबरला १०० वर आलेली रुग्णसंख्या सात जानेवारीला २२ हजारापर्यंत पोहोचली होती. १२ जानेवारीला १६ हजार रुग्णांची नोंद झाल्यानंतर १३ ते १५ जानेवारीदरम्यान पुन्हा बाधितांचा आकडा उतरणीला लागला आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ६५६ रुग्ण कमी झाले आहेत.

‘अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा’
मुलीचे छुपे चित्रीकरण करणारा निर्माता अटकेत; मॉडेलिंगच्या नावाखाली फसवणूक

रुग्णालयातील ८० टक्के खाटा रिक्त आहेत. शनिवारी आढळलेल्या दहा हजारांहून अधिक रुग्णांपैकी फक्त ७२२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी १११ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी २६५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. मंगळवारी ५४ हजार ५५८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या

६ जानेवारी – २०,६८१

७ जानेवारी – २०,९७१

८ जानेवारी – २०,३१८

९ जानेवारी – १९,४७४

रुग्णसंख्येचा उतरता आलेख

१० जानेवारी – १३,६४८

११ जानेवारी – ११,६७४

१२ जानेवारी – १६,४२०

१३ जानेवारी – १३,७०२

१४ जानेवारी – ११,३१७

१५ जानेवारी – १०,६६१

Marathi boards on shops: मराठी पाट्यांना भाजप समर्थकांचा विरोध; नवाब मलिकांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here