हायलाइट्स:

  • शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू
  • रत्नागिरीतील गुहागर परिसरातील वरवेली आगरेवाडीतील घटना
  • काही दिवसांपूर्वीच महिला आली होती माहेरी

गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर वरवेली-आगरेवाडी येथे धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना घडली. एका ४२ वर्षीय महिलेचा तोल गेल्याने शौचालयाच्या टाकीत पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही महिला नुकतीच आपल्या माहेरी आली होती.

मनाली विजय भागडे (वय ४२, मूळ राहणा वहाळ, तालुका चिपळूण) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मनाली या वहाळ येथून आपल्या माहेररी वरवेली येथे आल्या होत्या. घराच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या टाकीवरील कचरा काढताना ही दुर्दैवी घटना घडली. साफसफाई करताना टाकीवरील कडाप्पा तुटला. त्यामुळे मनाली यांचा तोल जाऊन त्या टाकीत पडल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले.

‘नाणार’चं काम रोखू नका, अन्यथा…; शिवसेनेच्या आमदाराला फोनवरून धमकी
मकर संक्रांतीच्या दिवशीच अघटित घटले; एकाच घरातील ३ वृद्ध महिला मृतावस्थेत आढळल्या, संशय मात्र वेगळाच

काय घडलं नेमकं?

गुहागरमधील वरवेली आगरावाडी येथे मनाली आल्या होत्या. येथे त्यांचे माहेरचे घर आहे. १५ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगरेवाडी येथील आपल्या घराच्या मागे असलेल्या शौचालयाच्या टाकीवरील कचरा काढण्यासाठी त्या गेल्या होत्या. साफसफाई करत असतानाच, टाकीवरील कडाप्पा तुटला. त्यानंतर मनाली यांचा तोल जाऊन त्या टाकीत पडल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. रक्तस्रावही झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रवींद्र रामचंद्र आगरे यांनी याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात माहिती दिली. या प्रकरणी अधिक तपास गुहागर पोलीस ठाण्याचे आनंदराव पवार करत आहेत.

रत्नागिरी जिल्हा हादरला; एकाच घरात तीन वृद्ध महिलांची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here