हायलाइट्स:

  • स्कॉर्पिओ झाडावर आदळली
  • गाडीतील तीन जण ठार, एक जखमी
  • सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर : सोलापूर -विजयपुरा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री औरादजवळच्या वकिल वस्ती येथे झाला. (सोलापूर अपघात ताज्या अपडेट्स)

सोलापुरात मंडप आणि लायटिंग कॉन्ट्रॅक्टर असलेले तिघेजण दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गेले होते. काम आटोपून घराकडे परतत असताना हा अपघात झाला.

देवीची यात्रा आणि बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणं पडलं महागात; पोलिसांची कारवाई

विजयपूर महामार्गवरील तेरा मैल याठिकाणी एम. एच. १३ झेड. ९९०९ या स्कॉर्पिओ गाडीतून औराद ते सोलापूर येथे येत असताना वकील वस्ती येथे स्कॉर्पिओ झाडाला धडकल्याने चौघेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केलं असता उपचारापूर्वीच यातील तिघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे.

यात किशोर अण्णाराव भोसले (वय वर्षे ४५) रा. सळई मारुती, उत्तर कसबा सोलापूर, नितीन भगवान भांगे (वय ३२) रा. निराळे वस्ती सोलापूर, व्यंकटेश राम म्हेत्रे (वय ४५) रा. मोदी सोलापूर अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात राकेश हुच्चे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सध्या सोलापूर-विजयपुरा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात याच परिसरात अशाच एका अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. या नव्याने होत असलेल्या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. तसंच हत्तुर जवळील बायपास हा देखील धोकादायक असल्याचं मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here