हायलाइट्स:

  • व्यवसाय जीवघेणा हल्ला प्रकरण
  • भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांना पोलिसांकडून अटक
  • सचिन खेमा यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे स्पष्ट
  • तरूणाला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केल्याचा राग

कल्याण : कल्याणमधील एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक सचिन कॅम्प यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. खेमा यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील व्यापारी अमजद सय्यद यांच्यावर पाच तारखेला प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात सय्यद जबर जखमी झाले होते. हा हल्ला भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांचा भाऊ नितीन खेमा, बबलू मजिद, प्रेम चौधरी व सतीश पोकळ यांनी केला होता. दरम्यान माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. दरम्यान या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी तपास सुरू केला. भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा आणि सतीशला अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत.

रत्नागिरी जिल्हा हादरला; एकाच घरात तीन वृद्ध महिलांची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
धक्कादायक! मुंबईत नाल्यात आढळला आई आणि ३ वर्षांच्या मुलाचा मृतदेह, जिथे मृतदेह आढळले तिथून जवळच…

काय आहे प्रकरण…

सचिन खेमा यांनी किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाला अमजद याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केली. याचाच राग मनात धरून अमजद यांच्यावर हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर अमजद यांच्याकडून पैसे मागण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मुंबईत ‘त्या’ कुटुंबाला २२ वर्षांनंतर मिळाले चोरी गेलेले ८ कोटींचे सोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here