मुंबई: राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन करोनाशी यशस्वी लढा देत आहेत. राज्यात आतापर्यंत १९६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यात मुंबईतील १४, तर पुण्यातील १५ जणांचा समावेश आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, ‘पॉझिटिव्ह’ बातमी आली आहे. करोनाशी यशस्वी लढा देऊन राज्यातील ३४ रुग्ण घरी परतले आहेत. या सर्वांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या १९६वर पोहोचली आहे. त्यात मुंबई व ठाणे परिसरात १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १,औरंगाबाद १ ,यवतमाळ ३ , मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १ , जळगाव १ आणि बुलडाण्यात १ असे एकूण १९६ रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली. या रुग्णांपैकी मुंबईतील १४, पुण्यातील १५, नागपूर १ , औरंगाबाद १, यवतमाळ ३ अशा एकूण ३४ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here