हायलाइट्स:

  • मुंबईत येणाऱ्या आंंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठी बातमी
  • दुबईसह यूएईतून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्या अटीतून सूट
  • सात दिवस होम क्वारंटाइन, आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्यच्या निर्णयातून सूट
  • मुंबई महापालिकेने नवीन दिशानिर्देश केले जारी

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात जानेवारीपासून पुन्हा करोनाचा प्रादूर्भाव वाढला होता. त्यामुळे दुबईसह संयुक्त अरब अमिरात (युएई) येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक होती. मात्र, मुंबई महापालिकेने यासंदर्भात नवीन सूचना प्रसिद्ध केली आहे. आता या प्रवाशांना या अटीतून सूट देण्यात आली आहे.

मुंबईत करोनाचा विषाणू ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी दिशानिर्देश जारी केले होते. दुबईसह यूएईमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांचे होम क्वारंटाइन आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आले होते. तर राज्याच्या अन्य परिसरात राहणाऱ्या व्यक्ती, ज्या या आंतरराष्ट्रीय विमानांतून येतील त्यांना सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास परवानगी नसेल. त्यांच्यासाठी वाहनांची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र, मुंबईतील ओमिक्रॉन आणि करोनाबाधितांचा संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन निर्देश दिले आहेत. आता दुबईसह यूएईमधून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांचे होम क्वारंटाइन आणि आरटीपीसीआर टेस्ट या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा हा निर्णय मध्यरात्रीपासून म्हणजे १७ जानेवारी २०२२ पासून लागू होईल.

Mumbai coronavirus: मुंबईत करोना लाट ओसरतेय; एका आठवड्यातच चित्र पालटले
Omicron in Maharashtra Update : महाराष्ट्रात अजूनही ओमिक्रॉनपेक्षा डेल्टा व्हेरियंटचा कहर; ‘त्या’ रिपोर्टमधून खुलासा

दरम्यान, मुंबईत करोना रुग्णवाढीचा आलेख सलग चौथ्या दिवशी घसरला आहे. कालच्या तुलनेत करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. आज, रविवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ७८९५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर ११ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आता मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ६०३७१ इतकी आहे.

घरबसल्या ‘व्हॉट्सअॅप चॅट-बॉट’ या अॅपद्वारे ८० सेवासुविधांचा मुंबईकरांना होणार लाभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here