हायलाइट्स:

  • सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता
  • त्यामुळे नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती

मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणातील कथित आरोपी आणि भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळाला आहे. तर याच प्रकरणातील आरोपी मनीष दळवी यांना मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा नितेश राणे (नितेश राणे) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणे यांना घालण्यात आल्या आहेत. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याठिकाणीही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली पोलिसांनी अटकेच्या हालचाली सुरु केल्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तब्बल १५ दिवस नितेश राणे अज्ञातवासात होते. अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर ते कणकवलीत प्रकटले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी आपण १७ जानेवारीनंतर बोलू, असे म्हटले होते. नितेश राणे यांच्या वकिलांनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनाचा अर्जच फेटाळल्याने नितेश राणे यांना पोलीस अटक करणार किंवा त्यांना पुन्हा अटकेपासून संरक्षण मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्यामुळे महाविकासआघाडीने नितेश राणे यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. मात्र, आता सत्र आणि उच्च न्यायालयानेही नितेश यांना अटकपूर्व जामीन नाकारल्याने नारायण राणे काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग बँकेत लागला राणेंचा फोटो; अध्यक्षांच्या केबिनमधील बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचा फोटो हटवला
काय आहे आरोप?

१८ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास सिंधुदुर्गमधील केनेडी रोडवर संतोष परब हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली होती. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्या कारमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूहल्ला केला आणि तो पसार झाला. या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच दिवशी रात्री चेतन पवार, करण बाळासाहेब कांबळे, अनिल नक्का व करण दत्तू कांबळे यांना अटक केली. त्यानंतर २० डिसेंबरला दीपक वाघोडेला व २६ डिसेंबरला सचिन सातपुतेला अटक केली. ‘संतोष परब हा जिल्हा बँक निवडणुकीत राणे कुटुंबाविषयी अपप्रचार करत असल्याने त्याला धडा शिकवायला हवा, असे म्हणत नितेश राणे यांनी सचिन सातपुतेला संतोषचा फोटो देऊन आवश्यक ते करण्यास सांगितले’, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here