हायलाइट्स:

  • चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट खाडीत कोसळली
  • खाडीतील गाळात कार रुतली, कारमध्ये सहा जण अडकले
  • ठाण्यातील कोळशेत येथील घटना
  • मुंबईतून सहा जण फिरण्यासाठी ठाणे परिसरात आले होते

ठाणे : मुंबई येथून केवळ मौजमजा करण्यासाठी सहा जण कारमधून आले होते. त्याचवेळी ठाण्यात कारवरील नियंत्रण सुटून ती थेट खाडीत कोसळली. खाडीतील गाळात कार रुतली. घटना घडली त्यावेळी कारमध्ये सहा जण होते. या सहा जणांचा जीव वाचवण्यात अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आलं आहे. मध्यरात्री ही कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. हे सहा जण मुंबई येथील चेंबूर परिसरातील राहणारे आहेत.

मुंबई येथील चेंबूर परिसरात राहणारे सहा जण फिरण्यासाठी आणि मौजमज्जा करण्यासाठी रात्रीच्या सुमारास ठाण्यात आले. मात्र, ठाण्यात फिरत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती बाळकुम पाइपलाइन रोड येथील कोलशेत परिसरातील खाडी भागात असलेल्या चिखलात जाऊन रुतली. गाळात रुतलेली कार बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र कार बाहेर काढण्याचा जेवढा प्रयत्न केला, तेवढी ती कार गाळात रुतत गेली. अखेर स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या कारमध्ये अडकलेल्या सहा जणांना सर्वप्रथम सुखरूप बाहेर काढले. तसेच कार क्रेनच्या मदतीने ओढून बाहेर काढली.

Mumbai News : आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
खळबळ! दुचाकीवरून दोघे गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येत होते, ATS पथकाला संशय आल्यानंतर…

याबाबत अधिक चौकशी केली असता, हे सहा जण मुंबई येथील चेंबूर परिसरात राहणारे असल्याची माहिती मिळाली. ते फिरण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यांनी वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक करून रात्री तीनच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर निघाले होते. यावेळी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी कारमधून रोहित नायर (वय २९), संकेत सिंग (वय २८) या सहा जणांना सुखरूप बाहेर काढले. ही कार हरेंद्र सिंग यांच्या मालकीची असून, संकेत सिंग हा कार चालवत असताना हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

‘नाणार’चं काम रोखू नका, अन्यथा…; शिवसेनेच्या आमदाराला फोनवरून धमकी

उड्डाणपुलावरून बॅनरबाजीच्या माध्यमातून श्रेयवादाची लढाई सुरूच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here