हायलाइट्स:
- मुंबईत २५ वर्षीय तरुणाचा झाला होता अपघात
- दहीसरजवळ मिनी बसने दिली होती धडक
- बस मालकाला न्यायाधिकरणाने बजावली होती नोटीस
- पुरावे आणि साक्ष याआधारे न्यायाधिकरणाने दिले आदेश
एका शाळेच्या बसने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार २५ वर्षीय तरूणाला अपंगत्व आलं होतं. मुंबई न्यायाधिकरणाने हा निर्णय दिला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराला उपाचारासाठी १३.६१ लाख रुपये खर्च आला होता. तसेच भविष्यात जवळपास ६४.८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय देण्यात आला आहे.
पीडित तरुणाच्या दाव्यानुसार, तो ४ जुलै २०१६ रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी दहिसरस्थित आपल्या घरून बोरीवली येथे आपल्या कार्यालयाकडे दुचाकीने जात होता. त्यावेळी तरूणाचे वय २५ वर्षे होते. त्याने सांगितले की, दहिसर येथे एक मिनी बस भरधाव वेगाने जात होती. बसच्या चालकाने इंडिकेटर न देता आणि पाठीमागे न बघता बस डाव्या बाजूसा वळवली. त्याचवेळी बसची धडक दुचाकीला लागली. या अपघातात तरूणाला जबर दुखापत झाली.
तरूणाला जबर दुखापत झाली. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. तसेच जखमाही झाल्या होत्या. या प्रकरणी बस चालकाविरोधात भरधाव आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. मिनी बसचा विमा एका खासगी विमा कंपनीकडून काढण्यात आला होता. एका महिन्याहून अधिक काळ तरूण रुग्णालयात दाखल होता. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्यावेळी उपचारासाठी त्याला ७ लाख रुपयांचा खर्च आला. मिनी बसच्या मालकाने नोटीस बजावूनही न्यायाधिकरणासमोर हजर झाला नाही. त्यामुळे त्याच्या युक्तिवादाशिवाय हा दावा पुढे सुरू ठेवण्यात आला. विमा कंपनीने या दाव्याला विरोध केला. हा अपघात भरधाव आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्यामुळे झाला होता. मिनी बस उभी होती, असाही दावा करण्यात आला. मात्र, साक्षीदारांची साक्ष, उपचारासंबंधी कागदपत्रे, बिल, दिव्यांग प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांचे पुरावे लक्षात घेऊन न्यायाधिकरणाने हा आदेश दिला.
न्यायाधिकरणाने आदेशात म्हटले की, पीडित तरुणाचा दावा फेटाळण्याचे असे कोणतेही ठोस कारण नाही. १३.६१ लाख रुपये उपचार खर्च आणि ६४.८० लाखांवर घटनेपासून ७.५ टक्के दरमहिना व्याजासह रक्कम पीडित तरुणाला देण्यात येतील, असे न्यायाधिकरणाने आदेश देताना नमूद केले.