हायलाइट्स:

  • चोरी करण्यासारखी गेल्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार
  • आरोपीचा तुरुंगात मृत्यू
  • कारागृहात भोगत होता जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर : जिल्ह्यातील २००१ मध्ये गाजलेल्या कोठेवाडी येथील महिलांवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील कैदी हब्या पानमळ्या भोसले (वय ५५) याचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील हरसूल कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सोमवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील १३ आरोपींना मोकोका अंतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यातील माफीच्या साक्षीदाराचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. (सामूहिक बलात्कार प्रकरण)

कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे १७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता संपूर्ण वस्तीवर १० ते १५ आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. तसंच ४४ हजार ३५ रुपयांचे दागिने लुटले होते. तेव्हा ही घटना राज्यात गाजली होती.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात चिंताजनक स्थिती; करोना रुग्णवाढीचा उच्चांक

अहमदनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली. नगरच्या सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. त्यानंतर आरोपींनी अन्य ठिकाणीही असेच गुन्हे केल्याचं आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला.

Rakesh Tikait: राकेश टिकैत यांचा पाठिंबा कोणत्या पक्षाला?; अखेर भूमिका केली स्पष्ट

यामध्ये सर्व १३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी २ वर्षे सक्तमजुरी, तर मोक्का कायद्याच्या कलम ३ (४) अन्वये सर्व आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने मोक्कांतर्गत झालेली शिक्षा रद्द ठरवली. आधीची शिक्षा भोगून झालेल्या आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे गावात पुन्हा दशहतीचे वातावरण निर्माण झंले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करून पुन्हा न्यायालयात धाव घेतली. आता त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here