बुलडाणा : जिल्ह्यात काही महिन्यापूर्वीच रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केल्याने गुटखा माफियांसह, अवैद्य धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

बुलडाणा जिल्हा हा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं होमटाऊन आहे. एफडीए मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध धंदे होतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. मात्र गुटखा माफियांच्या विरोधात प्रामुख्याने खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या परिक्षेत्रामध्येच म्हणजे घाटाखालील तालुक्यात कारवाई होताना दिसत आहे. आतापर्यंत कधीही पोलिसांच्या हातात न आलेले दोन गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय.

खामगावमध्ये 21 जानेवारी 2021 रोजी 35 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटका पोलिसांनी जप्त केला होता. ज्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या तपासानंतर खामगाव येथील गुटखा किंग निलेश राठी याला पोलिसांनी अटक केलीये तर दुसऱ्या प्रकरणात संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील धीरज जयस्वाल याला शेगावच्या प्रीतम आणि सौरभ टिबडेवाल यांनी दिलेल्या कबुली जबाबावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आयात केला जातो आणि त्याची विक्री केली जाते, हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने गुटखा माफियांचे मोठे मासे आता गळाला लागण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यादृष्टीने पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील अवैद्य गुटखा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी घाटाखालील पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.अशाच पद्धतीच्या कारवाई उर्वरित जिल्ह्यात देखील होणे अत्यंत गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here